Type Here to Get Search Results !

राहुरी - आ. प्राजक्त तनपूरे यांच्या वतीने तालूक्यातील महिलांसाठी भावबंध या कार्यक्रमाचे आयोजन.

 आ. प्राजक्त तनपूरे यांच्या वतीने तालूक्यातील महिलांसाठी भावबंध या कार्यक्रमाचे आयोजन.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालूक्यात अंगणवाडी व बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिला सामाजिक व उल्लेखनीय कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन तसेच भाऊबीज निमित्त माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी भावबंध या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 


आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी, पुढची पिढी सुदृढ आणि सक्षम करण्यासाठी अतिशय जिव्हाळ्याने कार्यरत असलेल्या माझ्या आशा वर्कर ताई, अंगणवाडी सेविका ताई, बचत गटांच्या सीआरपी ताई यांना प्रथम वंदन करण्यात आले. 


गेल्या काही वर्षांपासून राहुरी तालुक्यातील वाड्या, वस्त्या पर्यंत शासनाच्या सगळ्या योजना पोहोचवण्याचे काम आशा वर्कर ताई, अंगणवाडी सेविका ताई, बचत गटांच्या सीआरपी ताई यांनी अविरतपणे केले आहे.


महिला आणि बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्यामुळे राहुरी तालुक्यातील तमाम मायबाप जनतेची सेवा घडत आहे. कोव्हिडच्या काळात या महिलांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यासाठी व भाऊबीजेच्या निमित्ताने एक छोटीशी भेट देण्यासाठी माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या वतीने आशा वर्कर ताई, अंगणवाडी सेविका ताई, बचत गटांच्या सीआरपी ताई या सर्व महिलांना आग्रहाचे आमंत्रण देण्यात आले. 


दि. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता राहुरी शहरातील नगर मनमाड महामार्गावर असलेल्या स्नेहपूज मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या 'भावबंध' या कार्यक्रमास सर्व महिलांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार प्राजक्त प्रसादराव तनपुरे यांनी केले आहे.