जुना वाद आपण मिटवुन घेवु, असे म्हणून दोघा जणांकडून लोखंडी गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
आपल्या दोघांमध्ये झालेला जुना वाद आपण मिटवुन घेवु, असे म्हणून दोघा जणांनी भाऊसाहेब लोंढे यांना लोखंडी गज व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालूक्यातील वरवंडी येथे दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी घडलीय. याबाबत पोलिस ठाण्यात दोघांवर गून्हा दाखल करण्यात आलाय.
भाऊसाहेब भागीनाथ लोंढे, वय ३८ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील वरवंडी येथे वॉटर सप्लायर म्हणून नोकरी करतात. दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ९ वा. चे सुमारास भाऊसाहेब लोंढे हे नगर टाकी, वरवंडी शिवार, ता. राहुरी. येथील त्यांच्या घरी होते. तेथे आरोपी आले व मला म्हणाले की, आपल्या दोघांमध्ये झालेला जुना वाद आपण मिटवुन घेवु. त्यावेळी भाऊसाहेब लोंढे त्यांना म्हणाले की, ठिक आहे. आपण वाद मिटवुन घेवु, असे बोलत होते.
त्यावेळी आरोपींनी भाऊसाहेब लोंढे यांना शिवीगाळ करुन लोखंडी गज व लाथाबुक्यानी मारहान करु लागले. त्यावेळी भाऊसाहेब लोंढे यांची भावजाई भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांना देखील गजाने मारहान करुन जखमी केले.
त्यानंतर तु जर केस मागे घेतली नाहीतर तुला जिवेठार मारुन टाकीन. अशी आरोपींनी धमकी दिली. भाऊसाहेब भागीनाथ लोंढे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन रामनाथ आनंदा कोळेकर व भाऊसाहेब आनंदा कोळेकर, दोघे रा. नगर टाकी, वरवंडी शिवार, ता. राहुरी.
या दोघां विरुद्ध गून्हा रजि. नं. १३२१/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
