Type Here to Get Search Results !

राहुरी - तनपूरे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात भामट्याने चोरून नेली.

तनपूरे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात भामट्याने चोरून नेली.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथील माजी नगरसेवक नंदकुमार तनपूरे हे एका लग्न समारंभात गेले असता त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चैन अज्ञात भामट्याने चोरून नेली. ही घटना राहुरी शहर हद्दीत दि. २८ नोव्हेंबर २०२३ रोजी घडलीय. 


माजी नगरसेवक नंदकुमार ताराचंद तनपुरे, वय ४० वर्षे, रा. तनपुरेवाडी, राहुरी ता. राहुरी. हे दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुरी शहरातील नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या शुभकिर्ती लॉन्स येथे एका लग्न समारंभासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या गळ्यात साडेतीन तोळे वजनाची सोन्याची चैन होती. 


नंदकुमार तनपुरे हे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत त्या लग्न समारंभात होते. या दरम्यान त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात भामट्याने चोरून नेली. नंदकुमार तनपूरे यांनी चैन चा शोध घेतला. मात्र ती मिळुन आली नाही.


नंदकुमार ताराचंद तनपुरे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गून्हा रजि. नं. १३१६/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गून्हा दाखल करण्यात आलाय.