शाळेतून लोखंडी पाईप व बॅच चोरणारे दोन भामटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील कानडगाव येथील प्रगती माध्यमिक विद्यालय येथून दोन भामट्यांनी दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान लोखंडी पाईप व बॅच चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली असून लोंढे व संसारे या दोन भामट्यांवर चोरीचा गून्हा दाखल करण्यात आला.
राहुरी तालूक्यातील कानडगाव येथे प्रगती माध्यमिक विद्यालय आहे. त्या ठिकाणी आबासाहेब जिजाबा गडधे हे मुख्याध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. शाळेच्या छतावर काही लोखंडी पाईप ठेवलेले होते. दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री च्या दरम्यान दोन भामट्यांनी शाळेच्या आवारात प्रवेश करुन छतावरील सुमारे १४ हजार रुपए किंमतीचे लोखंडी पाईप व बॅच चोरुन नेले.
मुख्याध्यापक व इतर कर्मचारी सकाळी शाळेत आले, तेव्हा त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता. महेश रामनाथ लोंढे व रोहीदास सुभाष संसारे हे दोन भामटे चोरी करताना दिसून आले.
मुख्याध्यापक आबासाहेब जिजाबा गडधे यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेश रामनाथ लोंढे व रोहीदास सुभाष संसारे, रा. कानडगाव, ता. राहुरी या दोघांवर गून्हा रजि. नं. २२५/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गून्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
