Type Here to Get Search Results !

राहुरी - म्हैसगांव मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

 म्हैसगांव मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


जागतिक महिला दिनानिमित्त दि. ८ मार्च २०२४ रोजी राहुरी तालुक्यामधील म्हैसगांवमध्ये जागतिक महिला दिन व गुण गौरव सन्मान सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. 


महिला लोकनियुक्त सरपंच सुजता अरुण पवार, उपसरपंच शशिकांत गागरे, ग्रामसेवक एच बी पारधे यांनी सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालण तसेच नियोजन केले होते. यावेळी म्हैसगांव श्री केदारेश्वर देवस्थानचे माननिय ह.भ.प. पांचाळ महाराज देवस्थान ट्रस्ट हे उपस्थित होते. 


त्याच्या हस्ते म्हैसगांव येथिल सर्व क्षेत्रातिल आपली उत्कृष्ठ कामागिरी पार पाडणाऱ्या महिलांचा गुण गौरव सोहळा पार पडला. त्यावेळी सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. या वेळी माजी महिला सरपंच रुपाली दुधाट, सदस्य भिमा दुधाट, सी.आर. पी. स्नेहा रविंद्र गोसावी, नम्रता नंदकुमार कुटे, ग्राम संघ अध्यक्ष आशा तुकाराम नेहे, संगिता गोरख आग्रे, सर्व गटाचे अध्यक्ष व सचिव, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभाग, आशा सेविका, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व महिला व पुरुष सामील झाले होते.


 यावेळी सरपंच सुजाता पवार व अध्यक्ष आशा तुकाराम नेहे  यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत कडून या सर्व महिलांना शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ देऊन सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. यावर सर्व महिलांनी हसून साजरा करून आभार मानले.