Type Here to Get Search Results !

पारनेर : शुभेच्छांच्या वर्षावात आ. नीलेश लंके वाढदिवस साजरा ! हजारो नागरिकांकडून लंके यांना शालेय साहित्याची भेट

 शुभेच्छांच्या वर्षावात आ. नीलेश लंके वाढदिवस साजरा !


हजारो नागरिकांकडून लंके यांना शालेय साहित्याची भेट


महाराष्ट्रभरातून चाहत्यांची हजेरी 

 


पारनेर : प्रतिनिधी 


        आमदार नीलेश लंके यांचा ४४ वा वाढदिवस शुभेच्छांच्या वर्षावात मोठया उत्साहात साजरा झाला. हजारो नागरिकांनी आ. लंके यांची नगर, सुपा, हंगा तसेच पारनेर येथे भेट घेऊन लंके यांना शुभेच्छा देत त्यांना शालेय साहित्याची भेट दिली. राज्याच्या विविध भागातील हजारो चाहत्यांनी लंके यांची भेट घेत शुभेच्छा  दिल्या. 

          आ. लंके यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर येथील सिंधूताई सपकाळ अनाथ आश्रमात विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले. संगमनेर येथील वृध्दाश्रमातील वृध्दांना अन्नदान व कपडयांचे वितरण करण्यात आले. नगर शहरात ग्रामदैवत विशाल गणपती येथे आ. नीलेश लंके यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.  

       लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर आ. लंके यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेषतः नगर दक्षिण मतदारसंघातीली सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते यांनी आ. लंके यांना शुभेच्छा देण्यासाठी केलेली गर्दी लक्षणीय ठरली. 

        नगर जिल्ह्यासह कोल्हापूर, सांंगली, सातारा, सोलापूर, अक्कलकोट, बेळगांव, निपाणी, पुणे, बीड, औरंगाबाद, मुंबई येथील असंख्य लंके समर्थकांनी आ. लंके यांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती. 

     विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्याचा आ. नीलेश लंके यांचा शिरस्ता आहे. वाढदिवसासाठी शाल, हार, तुरे, बुके किंवा इतर भेट वस्तू न आणता शालेय साहित्य देण्याचे आवाहन आ. लंके यांनी केले होते. लंके यांच्या आवाहानास प्रतिसाद देत लंके यांच्या चाहत्यांनी मोठया प्रमाणावर शालेय साहित्याची भेट दिली. 


▪फोटो ओळ


आमदार नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो चाहत्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.