Type Here to Get Search Results !

पारनेर - टाकळी ढोकेश्वर येथे शिष्यगण मेळाव्याचे आयोजन.


 


टाकळी ढोकेश्वर येथे शिष्यगण मेळाव्याचे आयोजन. 


टाकळी ढोकेश्वर- प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे

श्री रामदास भाऊसाहेब बांडे शिष्य मंडळ आयोजित

गुरुपौर्णिमा उत्सव २०२४ शिष्यगण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रामदास बांडे महाराज यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून शिष्यगण तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील देखील शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते 

या कार्यक्रमासाठी नगर दक्षिणचे खासदार लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या पत्नी सौ राणीताई निलेश लंके या उपस्थित होत्या त्यांनी उपस्थित शिष्यगण व ग्रामस्थांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी कु. अथर्व महेश  बांडे याचा वाढदिवस व अनुग्रह कार्यक्रम संपन्न झाला 

त्यानंतर ह भ प गोरक्षनाथ महाराज रोकडे यांचे सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम  संपन्न झाला  त्यानंतर परिसरातील तसेच परगावातील गरजवंतांना वस्त्र वाटप कार्यक्रम  घेण्यात आला

 त्यानंतर शाहीर आण्णासाहेब चौरे सर शाहीर शांताराम किंकर साहेब तसेच संगीत रत्न भाऊसाहेब आंधळे यांचा भेदेकाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी

 महाप्रसादाचा कार्यक्रम होऊन शिष्यगण मेळाव्याची सांगता करण्यात आली 

या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके, टाकळी ढोकेश्वर गावचे सरपंच अरुणा खिलारी,

उपसरपंच किरण तराळ, माजी उपसरपंच विलास झावरे, माजी सरपंच सुनिता झावरे, जयसिंग झावरे, अंकुश पायमोडे, महेश पाटील, मळीभाऊ रांधवन, गंगाराम बांडे, बंडूशेठ रांधवन, महेश बांडे, आप्पा झावरे, अनिल माकरे ,यांच्यासह महाराष्ट्रातून आलेले शिष्य गण व समस्त ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर हे मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.