Type Here to Get Search Results !

पारनेर - शहरातील ३५० महिलांना श्री.गणेशाच्या आरतीसाठी केले सन्मानित !


 

पारनेर शहरातील ३५० महिलांना श्री.गणेशाच्या आरतीसाठी केले सन्मानित !

विनोद गायकवाड. टाकळी ढोकेश्वर - प्रतिनिधी

             महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींना प्रत्येक क्षेत्रात एक योग्य व सन्मानाचे व्यासपीठ मिळण्यासाठी अखंडित आग्रही असणाऱ्या पारनेर नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्ष सौ. सुरेखा भालेकर यांनी गेले अनेक वर्षापासून राजकीय सामाजिक असो की धार्मिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत महिला भगिनींना सन्मान मिळवून दिला आहे .

          गणेश उत्सवाच्या काळात खऱ्या अर्थाने गणेशाची पूजा व महापूजा करण्याचे काम घरातील महिला करत असते . परंतु बऱ्याच गणेश मंडळात महिलांना आरती करण्याचा सन्मान मिळत नसतो हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून पारनेर शहरातील रोज कमीत कमी ४०-४५ महिलांना आमंत्रित करून प्रत्येक महिलेच्या हस्ते गणेशाची आरती करण्याचा प्रयत्न या वर्षी केला आहे.यामध्ये पारनेर शहरातील समाजसेवेत हिरीरीने भाग घेत असणार्या महिलांना आमंत्रित करत आहोत व त्यांचा सन्मान करत आहोत.समाज सेवेची दिपज्योत सतत तेवत राहावी या साठी येणाऱ्या प्रत्येक महिलेला समाजसेवेची प्रतिक म्हणून समई भेट देण्यात येते.त्याचबरोबर महिला व बालकल्याण समितीचे पद दुसर्यांदा भूषवीत असताना येणार्या पुढील काळात पारनेर शहरात महिला सक्षमीकरणा साठी विविध योजना राबवणार असून त्या मध्ये महिलांसाठी आरोग्याचे शिबिर जि.परिषद सदस्य राणीताई लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात स्तन कर्करोग (BREAST CANCER) तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात येणार असून पारनेर शहरात बुधवार दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते ५ पर्यंत हे शिबीर आयोजित केले आहे तरी शहरातील जास्तीत जास्त महिलानी या शिबिरात भाग घेण्याचे आवाहनही यावेळी सुरेखा अर्जुन भालेकर यांनी केले आहे . 

चौकट :- 

महिलांच्या विविध समस्या या वारंवार निदर्शनास आणून देत त्यावर काहीतरी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आग्रही असणाऱ्या व महिला माता भगिनींसाठी काहीतरी वेगळेपण निर्माण करून महिला सक्षमीकरण हे ध्येय समोर ठेवून अखंडित कार्यरत असणाऱ्या , सौ.सुरेखाताई अर्जुन भालेकर यांनी या पूर्वी पारनेर नगरपंचायत मध्ये तीन वेळा सभापती पद व उपनगरध्यक्षा पद भूषविले आहे.प्रत्येक वेळेस पदाच्या माध्यमातून पारनेर शहरातून जनतेला न्याय देण्याचे काम त्या करत असतात.शहरातील महिलांचे सक्षमीकरण , आरोग्य आणि महिलांच्या समस्या सोडवण्याचे काम हे प्रेरणादायी आहे.

सौ.राणीताई निलेश लंके