टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेली वासुंदे ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा सुमन सैद यांनी राजीनामा दिल्यानंतर मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये वासुंदे ग्रामपंचायत सरपंच पदी नव्याने विमल झावरे यांची बिनविरोध निवड झाली.
निवड प्रक्रियेच्या दिवशी मंगळवारी दुपारी सरपंचपदासाठी विमल पोपटराव झावरे यांचाच अर्ज आला होता. अर्जावर सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शंकर शिंदे होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी पंकज जगदाळे, सहाय्यक म्हणून तलाठी दत्तात्रय शिंदे, ग्रामसेवक भास्कर लोंढे यांनी काम पाहिले. सरपंच सुमन रंगनाथ सैद यांनी काही दिवसा पूर्वी राजीनामा दिला होता. म्हणून ही निवड प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित सरपंच विमल पोपटराव झावरे या कान्हूर पठार पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक पोपटराव झावरे यांच्या पत्नी आहेत. निवडीनंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित पा. झावरे यांच्या हस्ते विमल झावरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच सुमन सैद, उपसरपंच शंकर बर्वे, वडगाव सावताळ माजी. सरपंच राजेंद्र रोकडे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य विलास साठे, रंगनाथ सैद, रभाजी झावरे, बाळासाहेब शिंदे, नाभाबाई केदार, रामदास झावरे, दिलीप पाटोळे, मारुती उगले, बाळासाहेब झावरे, चेअरमन नारायण झावरे, व्हा. चेअरमन रा. बा. झावरे, सगाजी दाते सर, बाळासाहेब भालके सर, बाळासाहेब वाबळे, शिक्षक नेते प्रवीण झावरे, डॉ. अमोल झावरे, युवा नेते मनोज झावरे आदी उपस्थित होते. सरपंच विमल झावरे यांचा यावेळी सुजित पा. झावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व झावरे यांनी सरपंच विमल झावरे व सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
चौकट :
वासुंदे ग्रामपंचायतच्या सदस्यांनी एकमताने सरपंच पदी माझी बिनविरोध निवड केल्यामुळे यापुढील काळात काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे तसेच प्रामुख्याने महिलांच्या हितासाठी काम करणार आहे.
विमल पोपटराव झावरे
(नवनिर्वाचित सरपंच, वासुंदे)
