Type Here to Get Search Results !

राहुरी - स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर

 स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर



नगर: राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने (टायगर मुमेंट) पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाथा फकिरा आल्हाट यांनी कर्डिले यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. कर्डिले यांनी गोरगरीब दलित, बहुजन समाजाला कायम न्याय देण्याचे काम केले आहे. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कायम आग्रही असतात. पंचवीस वर्षे आमदार असताना त्यांनी नेहमीच समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. त्यांच्या या कार्याला पाठबळ देण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते कर्डीले यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत असे आल्हाट यांनी सांगितले.