विधानसभेच्या निवडणुकीत सौ. अनुराधाताई नागवडे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालक व सेवानिवृत्त सेवकांच्या स्नेह मेळाव्यामध्ये करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालक व सेवानिवृत्त सेवकांचा छोटासा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर प्रसंगी कारखान्याचे माजी संचालक व सेवानिवृत्त सेवक यांनी सौ. अनुराधाताई नागवडे यांना एकमुखी पाठिंबा देऊन जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्याचा संकल्प केला.
सदर प्रसंगी बोलताना कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे म्हणाले की, स्वर्गीय शिवाजीराव बापू नागवडे यांच्या छत्रछायेखाली काम करत असताना त्यांनी दिलेली शिकवण , दिलेली नैतिक मूल्य व संस्कार हा अमूल्य ठेवा जन्मभर पुरेसा असून त्या शिदोरीवरच सर्व कामगारांचे प्रपंच उभे राहिले असून आज आनंदाने फुललेले दिसत आहेत. ही अतिशय समाधानाची बाब आहे. बापूंचा वसा व वारसा घेऊन वाटचाल करीत आहोत. ही वाटचाल करत असताना समाजाशी निर्माण झालेला ऋणानुबंध हा अखंड अभेद्य राहील अशी ग्वाही दिली.
शुक्रवार ता. 15 रोजी सायंकाळी सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा येथे सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व सेवानिवृत्त सेवक यांचा एकत्रित स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कारखान्याचे माजी व्हा. युवराज चितळकर, माजी संचालक सर्वश्री जिजाराम खामकर, प्रा सुनील माने, अॅड . अशोक रोडे, अॅ.ड. सुनील भोस, हेमंत नलगे सर, अशोकराव काळाने, आबासाहेब कोल्हटकर, रमेश नाना जाधव, आबासाहेब जंगले, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रवीण कुरमकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी संचालक सर्वश्री सचिन कदम, रंगनाथ कुताळ, गोपीचंद इथापे, प्रेमाकाका भोईटे, प्रा. धर्मनाथ काकडे, मुरलीधर भोस, विलास नाना काकडे आदींसह दादासाहेब बांदल, वसंतराव गिरमकर, विठ्ठल आप्पा नागवडे, भुजंगराव नागवडे, आप्पासाहेब शेळके, किसनराव लकडे यांच्यासह सेवानिवृत्त कामगार व अधिकारी उपस्थित होते.
