Type Here to Get Search Results !

नेवासा - नाताळनिमित्ताने अब्दुलभैया कडून केकचे वाटप ....


 


नेवासा - नाताळनिमित्ताने अब्दुलभैया कडून केकचे वाटप 

नेवासा - ख्रिसमस नाताळ निमीत्त तालुक्यातील कुकाणा, चिलेखनवाडी, तरवडी, काळेगाव, पिंपरी शहाली, वाकडी, वरखेड अशा विवीध चर्च मध्ये नेवासा तालुका राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते अब्दुलभैय्या शेख यांनी भेट देत नाताळ निमीत्त सर्व बांधवांना शुभेच्छा दिल्या. ख्रिश्चन बांधवांना अब्दुलभैय्या शेख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेवासा तालुक्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मानिमीत्त केक वाटप करण्यात आले. तसेच सर्व धर्म समभाव जपण्याचा संदेश यावेळी अब्दुलभैय्या शेख यांनी उपस्थितांना दिला. या प्रसंगी कुकाणा येथिल इमुनल चर्चमध्ये अब्दुलभैय्या शेख, पास्टर यहोशवा मोहिते, बापुसाहेब पवार, मकरंद राजहंस, सतीश कावरे, सुमन मोहिते, आशा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.