परभणी येथील घटनेचा टायर जाळून निषेध व्यक्त.
संविधान विटंबना घटनेचा निषेध म्हणून गाव कडकडीत बंद.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
परभणी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकाने तोडफोड करून विटंबना केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहे. या घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंटकाने तोडफोड करून विटंबना केल्याची घटना घडली. सदर घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने संविधानीक मार्गाने कडकडीत गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी गावातील संपूर्ण व्यापारी वर्गाने या बंदला उस्फूर्त असा प्रतिसाद दिला.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती अगरबत्ती प्रज्वलित करुण भीम स्मरण घेऊन निषेध कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेकांनी रस्त्यावर टायर जाळून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.
