Type Here to Get Search Results !

टाकळी ढोकेश्वर - नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे बासरी वादनाच्या सांस्कृतिक मैफलीत प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध !

 नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे बासरी वादनाच्या सांस्कृतिक मैफलीत प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध !




स्पीक मॅके संस्था आयोजित बासरी वादनातुन औपचारिक शिक्षणाची गुणवत्ता समृद्ध करण्याचा मानस ! 


टाकळी ढोकेश्वर : प्रतिनिधी

             विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रतिबद्ध असलेल्या पी .एम.श्री जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर येथे शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी नवोदय विद्यालय समिती तसेच संभागीय कार्यालय पुणे द्वारा आयोजित स्पीक मॅके या भारतीय वारशाच्या अमूर्त पैलूंना प्रोत्साहन देणाऱ्या भारतीय वारशाच्या विविध पैलूंबद्दल जागरूकता वाढवून त्यात अंतर्भूत मूल्य आत्मसात करण्यासाठी, युवा पिढीला प्रेरणा देऊन औपचारिक शिक्षणाची गुणवत्ता समृद्ध करण्याचा मानस ठेवून कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आयोजित बासरी वादन कार्यक्रम संपन्न झाला. 

           कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन तसेच कार्यक्रमाचे मुख्य अतिथी प्रख्यात बासरी वादक पंडित राजेंद्र कुलकर्णी,तबलावादक श्री.श्रीकांत भावे तसेच सहा.बासरी वादक शुभम चौडे या मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली. 

या कार्यक्रमांतर्गत पंडित श्री.राजेंद्र कुलकर्णी यांनी राग भिमपलासी ताल झपताल तीन ताल, राग देश उपशास्त्रीय धून वाजवून आपल्या बासरीतील अद्वितीय सुरांनी सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी व इतर सर्वच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या बासरी वादनानंतर काही विद्यार्थ्यांनी त्यांना स्पीक मेकेच्या बोधचिन्हाचा अर्थ ? आपणास बासरी वादनाची प्रेरणा कशी व कुठून मिळाली? तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासात संगीताची मदत कशी होईल? असे प्रश्न विचारण्यात आले.    

            विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना पंडित राजेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की  स्पीक मॅके संस्थेचे प्रतीक हे भारताच्या सांस्कृतिक वारशाचे, संगीत नृत्य व इतर कलांची गहनता दर्शवते. शास्त्रीय संगीताच्या श्रवणाची मदत अभ्यासात मन एकाग्र करण्यास निश्चितपणे होऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

         मा.प्राचार्य श्री.समाधान बोरसे सर यांनी अतिथींचे स्वागत केले व उपप्राचार्य श्री. जी.बी.मुन्नारवार सर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.हा कार्यक्रम विद्यालयाच्या सांस्कृतिक परंपरेतील एक संस्मरणीय क्षण ठरला.