Type Here to Get Search Results !

राहुरी - पोलिसाच्याच गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट ची कारवाई

 पोलिसाच्याच गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट ची कारवाई.



पोलिसांकडून एका पोलिसाच्या दुचाकीवर कारवाई करुन दंड वसूल केला.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी येथील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विना नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या दुचाकीवर कारवाई करण्याचे काम सुरु आहे. मात्र एका पोलिस कर्मचाऱ्याच्याच दुचाकीवर फॅन्सी नंबर प्लेट दिसून आल्याने तात्काळ दंडात्मक कारवाई करण्यात आली. 


राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने विना नंबर प्लेट कारवाई करून चोरीचे वाहन पकडण्याची मोहीम राबवली होती. 

परंतु पोलिसांच्याच गाडीला फॅन्सी नंबर प्लेट असल्याची तक्रार राहुरी पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली. वाहतूक पोलीस हवालदार बापू फुलमाळी यांच्या दुचाकीवर फॅन्सी नंबर प्लेटची कारवाई करून एक हजार रुपये दंड आकारून सदर दंड भरून घेतला.


तसेच सदर दुचाकी पोलीस ठाणे येथे आणून तिच्यावर प्रमाणित नंबर प्लेट बसून घेतल्या नंतर दुचाकी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या ताब्यात देण्यात आली. सदर कारवाईचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांकडून अभिनंदन करून स्वागत केले. 


पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी एक आदर्श प्रस्थापित करत कायदा हा सर्वासाठी समान आहे. हे दाखवून दिले. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या कामकाजावर सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.