श्रीरामपूर येथील कुविख्यात सराईत गुन्हेगार गावठी कट्टयासह जेरबंद
आरोपीने फायर करून खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न
स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई
-----------------------------------------------------------------------------------------
मा.श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती घेऊन, कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, बाळासाहेब खेडकर, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड व महादेव भांड अशांचे पथक तयार करून श्रीरामपूर येथील अवैध धंदयाची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
दिनांक 09/02/2025 रोजी तपास पथक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेकामी माहिती घेत असताना सपोनि/हेमंत थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे शाहरूख रज्जाक शेख, रा.निमगाव खैरी, ता.श्रीरामपूर हा फॉर्चुनर गाडी क्रमांक एम-04-एफ-4771 मधुन बेलापूर येथुन टिळकनगर, श्रीरामपूर येथे गावठी कट्टासह येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीवरून बेलापूर ते टिळकनगर जाणारे रोडवर कुऱ्हे वस्तीजवळ सापळा लावून थांबलेले असताना त्यांना बातमीतील वाहन मिळून आल्याने, वाहनास थांबवून त्यांना तपास पथक व पंचाची ओळख सांगुन त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) शाहरूख रज्जाक शेख, वय 32, रा.निमगाव खैरी, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. पथकाने पंचासमक्ष त्याची अंगझडती घेऊन त्याचे ताब्यातुन 54,000/- रू किंमतीचे एक गावठी पिस्तुल, 04 जिवंत काडतुस, 10,00,000/- रू किंमतीची ग्रे रंगाची टोयोटा कंपनीची फॉरच्युनर गाडी एम-04-एफ-4774 व 20,000/- रू किं. एक मोबाईल असा एकुण 10,74,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पथकाने ताब्यातील आरोपीकडे मिळून आलेल्या गावठी पिस्तुल हे कोठून आणले याबाबत विचारपूस केली असता त्याने काहीएक माहिती सांगीतली नाही.आरोपीस विश्वासात घेऊन त्याने आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय याबाबत विचारपूस केली असता त्याने मागील दोन - तीन महिन्यापुर्वी श्रीरामपूर येथील अशोकनगरकडे जाणारे उड्डाणपुलावर एक इसमावर गावठी कट्टातुन फायर केला असल्याची माहिती सांगीतली.
आरोपी नामे शाहरूख रज्जाक शेख, वय 32, रा.निमगाव खैरी, ता.श्रीरामपूर, जि.अहिल्यानगर याचेविरूध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 120/2025 आर्म ऍ़क्ट कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
आरोपीने श्रीरामपूर येथे फायर करून केलेल्या गुन्हयाच्या सांगीतलेल्या माहितीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील खालीलप्रमाणे 01 खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
आरोपी नामे शाहरूख रज्जाक शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे एकुण 10 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे -
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 श्रीरामपूर शहर 103/2013 भादंविक 399, 402
2 लोणी 172/2012 भादंविक 399, 402
3 श्रीरामपूर शहर 368/2012 भादंविक 380, 454, 457
4 कोपरगाव शहर 392/2024 बीएसएस कलम 119 (1), 115 (2), 352
5 शिर्डी 27/2013 भादंविक 323, 504, 506 सह आर्म ऍ़क्ट 4/25
6 श्रीरामपूर शहर 45/2014 भादंविक 307 आर्म ऍ़क्ट 4/25
7 कोपरगाव शहर 189/2015 भादंविक 224, 225, 120 (ब)
8 कोपरगाव शहर 370/2013 भादंविक 307, 504, 506
9 श्रीरामपूर शहर 1104/2024 बीएनएस कलम 109, 115 (2), 3(5) सह आर्म ऍ़क्ट 3/25
10 नारायण गाव जि.पुणे 52/2016 भादविक 395, 392, 363 सह मोक्का 3 (1) ii, 3 (4)
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर, मा. श्री. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
