शिवसेनेत प्रत्येकाला मानसन्मान दिला जाईल -आ खताळ
संगमनेरखुर्द उबाठा गटाच्या पदाधिका ऱ्यांसह झोळेचे उपसरपंचांचा शिवसेनेत प्रवेश
संगमनेर शाविद शेख
मी जरी आमदार असलो तरी उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांचा एक कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. शिवसेनेत सर्व जण स्वतःला कार्यकर्ता समजून काम करत असतात. शिवसेने मध्ये प्रवेश केलेल्या सर्व शिवसैनिकांचा मानसन्मान केला जाईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला
संगमनेर खुर्द गटातील उबाठा गटाचे उपतालुकाप्रमुख निलेश गुंजाळ गणप्रमुख संकेत खुळे सचिन पावबाके पांडुरंग कानवडे यांच्यासह झोळे गावचे विद्यमान उपसरपंच मेजर गोविंद खर्डे यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत आमदार अमोल खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत
प्रवेश केला आहे. या वेळी व्यासपीठावर शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे रमेश काळे शहर प्रमुख दिनेश फटांगरे गणप्रमुख श्याम राहणे उपशहर प्रमुख अजित जाधव यांच्यासह संगमनेर खुर्द ,रायतेवाडी निमगाव पागा येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ खताळ म्हणाले की संगमनेर खुर्द गटातील अनेक शिवसैनिकांची उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती आज पूर्ण झाली आहे मी जरी या तालुक्याचा आमदार असलो तरी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचाराचा वारसा पुढे चालवत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची ताकद वाढत आहे. सर्वसामान्यांची कामे त्यांच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वाढत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. संगमनेरमध्ये सर्वसामान्यासाठी लवकरच आपले संपर्क कार्यालय सुरू होत आहे. त्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी स्वतः उप मुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे येणार आहेत तेव्हा असंख्य तरुण शिवसेनेत प्रवेश करणार आहे. नवीन आलेल्यांना कधीच नवीन जुने असे जाणवणार नाही. सर्व शिवसैनिक हे नेते नव्हे तर कार्यकर्ते आहे असे मानून काम करा शिवसेना हा आपला परिवार आहे. समाजातील सर्व घटकातील लोकांची कामे झाली पाहिजे यासाठी प्रयत्नशील रहा. गडबाजी कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही अशी तंब शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देत आमदार खताळ म्हणाले की संगमनेर खुर्द गटातील आणि गणातील काही विकासाचे प्रश्न बाकी असतील ते सर्व करण्यासा कटिबद्ध राहील लवकरच उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आभाराचा मेळावा घ्यायचा आहे. त्या वेळी सुद्धा संख्येने तरुण शिवसेनेत प्रवेश करणार आहे आगामी काळात तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकी मध्ये आपल्याला भगवा फडकवायचा आहे त्या दृष्टीने सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागावे असा ही सल्ला आमदार खताळ यांनी शिवसैनिकांना दिला .
आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी अनेक दिवसापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे काम करत होतो परंतु आम्हाला कधी मानसन्मान दिला नाही. तसेच या गटाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना आम्ही निवडून आणले. परंतु ते आता आम्हाला विचारत नाही आणि आमचा फोनही उचलत नाही असा गंभीर आरोप करत जर आपल्याला या पक्षात कोणी विचारत नसेल तर राहून उपयोग तरी काय असे मानून आम्ही सर्व शिवसेना पदाधिकर्यांसह असंख्य शिव सैनिकांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करत आ.अमोल खताळ यांच्या नेतृत्वा खाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच् शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे परखड मत शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख निलेश गुंजाळ संगमनेर खुर्द गटप्रमुख संकेत खुळे यांनी व्यक्त केले
गेली अनेक वर्षापासून माझ्या झोळे गावचा विकास झाला असता तर झोळे गावाचा कागापलट झाला असता. परंतु गेलीच चाळीस वर्षात गावाचा विकास झाला नाही त्यामुळे माझ्या गावाचा विकास करण्यासाठी तसेच हिंदुत्वाची भावना जागृत करण्यासाठी आणि या गावातील लोकांच्या मनातील दहशत घालवण्यात मी यशस्वी झालो त्यामुळे गावाच्या विकासासाठी आपण आमदारा अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे
श्री गोविंद खर्डे
उपसरपंच झोळे ग्रामपंचायत

