माय लेकाला शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
आमच्या बांधावर तुम्ही गव्हाचे भुस व सिमेंट ठेवायाचे नाही ही बांधावरील जागा आमची आहे. असे म्हणुन आरोपींनी दोघा माय लेकाला शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील चेडगाव येथे दि. २२ जून रोजी सकाळच्या सुमारास घडली.
मिरा अदिनाथ गिरी, वय ४५ वर्षे, ह्या राहुरी तालुक्यातील चेडगाव येथे राहत असून त्यांच्या शेजारी शंकर भाऊसाहेब गिरी व नंदु भाऊसाहेब गिरी यांची शेती असुन ते नेहमी शेतीच्या बांधावरुन वाद घालीत असतात.
दि. २२ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान आरोपी हे मिरा गिरी यांच्या घरा समोरील गव्हाचे भुस व सिमेंटचे गोण्या काढुन बाजुला फेकत होते. त्यावेळी मिरा गिरी त्यांना म्हणाल्या की, तुम्ही आमच्या गव्हाचे भुस व सिमेंटच्या गोण्या काढुन बाजुला का फेकत आहात. त्यावेळी आरोपी म्हणाले की, आमच्या बांधावर तुम्ही गव्हाचे भुस व सिमेंट ठेवायाचे नाही ही बांधावरील जागा आमची आहे.
असे म्हणुन आरोपींनी मिरा गिरी व त्यांचा मुलगा मिनिनाथ या दोघा माय लेकाला शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मिरा गिरी यांच्या मुली ज्योती व प्रियंका या दोघी भांडण सोडवीण्यासाठी आल्या असता त्यांना देखील धक्काबुक्की केली.
घटने नंतर मिरा अदिनाथ गिरी यांच्या फिर्यादीवरून आरोपी शंकर भाऊसाहेब गिरी, नंदु भाऊसाहेब गिरी, शुभम संजय गिरी, सार्थक संजय गिरी, सर्व रा. चेडगाव, ता. राहुरी, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. ६९८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
