Type Here to Get Search Results !

नेवासा - पोलीस मित्र बागुल यांचा DYSP खाडे यांच्याकडून सत्कार

 नेवासा - पोलीस मित्र बागुल यांचा DYSP खाडे यांच्याकडून सत्कार 




नेवासा - पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र राज्यात विविध धार्मिक आणि सामाजिक ठिकाणी पोलिसांना मदत करणाऱ्या पोलीस मित्रांच्या जनरक्षक सामाजिक संस्थेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी आकाश बागुल यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल नेवासा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी बागुल यांचा सत्कार केला. यावेळी जनरक्षक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आदर्श साळवे, आकाश मिसळ, आकाश गायकवाड, राहुल सकट, दिशांत शेख,मच्छिंद्र कुटे, साहिल मकासरे, संदेश गाडेकर आदींसह जनरक्षक सामाजिक संस्थेचे पोलीस मित्र उपस्थित होते.