सोमनाथ काळे यांना मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
पावसाने पडलेली भिंत बांधत असताना आरोपी तेथे आले आणि इथले दगड उचलू नको. असे म्हणुन आरोपींनी सोमनाथ काळे यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी व टिकाव मारून जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे दि. १३ जुलै रोजी घडली.
सोमनाथ रमेश काळे, वय ३६ वर्षे, हे राहुरी तालुक्यातील ब्राम्हणगाव भांड येथे राहत आहे. दि. १३ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास सोमनाथ यांचे भाऊ सचिन हे पावसाने पडलेली सामाईक भिंत बांधत असताना तेथे आरोपी आले आणि म्हणाले कि, तु इथले दगड उचलु नकोस. तेव्हा सचिन हे त्यास म्हणाला कि, मी माझ्याच घराजवळचे दगड उचलत आहे. तेव्हा आरोपींनी त्यास शिवीगाळ केली.
त्यानंतर सोमनाथ काळे हे तेथे गेले व आरोपींना म्हणाले कि, तुम्ही वाद कशाला घालता, काय असेल ते आपण मिटवुन घेवु. तेव्हा आरोपींनी सोमनाथ काळे यांना शिवीगाळ करुन लाथा बूक्क्यांनी व टिकाव मारून जखमी केले. तेव्हा त्यांची आई भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना देखिल घाणघाण शिवीगाळ केली. तसेच पुन्हा तुम्ही आमचे नादी लागलात तर तुम्हाला जिवे ठार मारून टाकु, अशी धमकि दिली. यावेळी सोमनाथ यांच्या आईच्या गळ्यातील पोत तुटून गहाळ झाली आहे.
सोमनाथ रमेश काळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी हरिभाऊ विठ्ठल काळे व प्रभाकर विठ्ठल काळे, दोघे रा. ब्राम्हणगाव भांड, ता. राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. नं. ७७८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३ (५), ३५२, ३५१ (२), ११८ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.