शिलाताई आप्पासाहेब झावरे यांचे अल्पशा आजाराने दु:खद निधन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहाता तालुक्यातील चितळी येथील शिलाताई आप्पासाहेब झावरे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. मृत्यू समयी त्या ७५ वर्षांच्या होत्या.
शिलाताई या सरळ, मनमिळाऊ व धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या अपरोक्ष पती, तीन मुले, सुना, नातवंडे
असा परीवार आहे. त्या चितळी येथील वैद्यकीय व्यावसायिक डॉ. आप्पासाहेब झावरे यांच्या पत्नी तसेच नरेंद्र झावरे यांच्या आई होत. त्यांच्या निधना बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.