Type Here to Get Search Results !

राहुरी - ५ लाख रुपयांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

 ५ लाख रुपयांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


घराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपए आणावेत, यासाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करुन तीला घरातून हाकलून देण्यात आले. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या पाच लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 


निशाद आरिफ शेख, वय २७ वर्षे, रा. बारगाव नांदुर, हल्ली रा. मानोरी, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, निशाद शेख यांचा विवाह दि. २४ डिसेंबर २०१७ रोजी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथील आरिफ वजीर शेख याच्याशी झाला होता. 


सासरच्या लोकांनी लग्नानंतर सुमारे दिड वर्षा पर्यंत निशाद शेख यांना चांगल्या प्रकारे वागणुक देवुन नांदविले. त्यानंतर घराचे बांधकाम करण्यासाठी निशाद शेख यांनी माहेरहून ३ लाख रुपये आणावेत म्हणून त्रास देऊ लागले. सन २०२२ मध्ये निशाद शेख यांनी माहेरहून ३ लाख रुपए आणून सासरच्या लोकांना दिले. 


सहा महिन्या नंतर पून्हा घराचे राहिलेले बांधकाम पूर्ण करण्यासाठी निशाद शेख यांनी माहेरहून ५ लाख रुपए आणावेत, म्हणून त्यांना मारहाण करत उपाशी पोटी ठेवुन शारीरिक व मानसिक छळ करुन त्यांना घरातून हाकलून देण्यात आले.


निशाद आरिफ शेख यांनी अखेर राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी पती- आरिफ वजीर शेख, सासरा- वजीर आब्दुल शेख, सासु- आफसाना वजीर शेख, तिघे रा. बारगाव नांदुर, ता. राहुरी तसेच यास्मिन सोनल शेख, रा. राहुरी, आस्मा जावेद शेख, रा. देवळाली प्रवरा, बिरोबावाडी, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ७७१/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ८५, ३५२, ३५१ (2), ३ (५), ११५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.