क्रमांक : पीआरओ/प्रेसनोट/239/2025 प्रेस नोट दिनांक :- 17/09/2025
-----------------------------------------------------------------------------------------------
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हयातील 08 मंदिर चोरीचे गुन्हयातील आरोपींची टोळी केली जेरबंद.
-----------------------------------------------------------------------------------------------
मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्हयात मंदिर चोरी गुन्हे उघडकी विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार, पोनि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/ राहुल व्दारके, पोहेकॉ/ लक्ष्मण खोकले, पोहेकॉ/ फुरकान शेख, पोहेकॉ/ दिपक घाटकर, पोना/ रिचर्ड गायकवाड, पोना/ भिमराज खर्से, पोकॉ/ रमीजराज आतार, पोकॉ/ सुनिल मालणकर यांचे विशेष पथके बनवुन अहिल्यानगर जिल्हयातील मंदिर चोरी गुन्हे उघडकी विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिले. त्याअनुषंगाने विशेष पथकाने जिल्हयातील मंदिर चोरी संदर्भात विविध गुन्हयाची माहिती घेतली असता, नगर तालुका पो.ठाणे येथे दाखल प.ना.कॉ. रजिस्टर नंबर 767/ 2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे दाखल अदखलपात्र गुन्हयातील आरोपीबाबत गुप्त बातमीदारामार्फत तसेच व्यावसायिक व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आरोपी नामे दिपक कचरे, रा. लोहगाव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर हा भुईकोट किल्ला मैदान भिंगार येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता, पोनि किरणकुमार कबाडी यांना माहिती देवुन, त्यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचुन, गुप्त माहितीप्रमाणे इसम ताब्यात घेऊन, चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नांव 1) दिपक रावसाहेब कचरे, वय- 24 वर्षे, असे सांगितले असता, त्यांचे सोबत अजुन दोन इसम यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नांवे 2) किरण बाळासाहेब राऊत, वय- 20 वर्षे, 3) अजय उर्फ लाल्या वसंत बनसोडे, वय- 18 वर्षे, सर्व राहाणार नेहरुनगर, लोहगाव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर असे सांगितले, अधिक चौकशी केली असता, त्यांनी तीघांनी मिळुन नगर तालुका पो.ठाणे हद्दीत दाखल प.ना.कॉ. रजिस्टर नंबर 767/ 2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली देवुन, दानपेटीतील 71,000/- रुपये वाटुन घेतलेबाबत माहिती दिली. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांचेकडुन एकुण 32,060/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ताब्यातील आरोपी 1) दिपक रावसाहेब कचरे याला विश्वासात घेऊन, अशा प्रकारे आणखी गुन्हे केलेबाबत विचारपुस केली असता, आरोपी 2) व 3) साक्षीदारांसह, तीघांनी मिळुन अहिल्यानगर जिल्हयात विविध ठिकाणी खालील प्रमाणे गुन्हे केल्याची माहिती दिलेवरुन, खालील गुन्हे उघडकीस आले आहे.
अ.क्र. पोलीस ठाणे नांव गुन्हा रजि.नं. कायदा कलम
1 नगर तालुका प.ना.कॉ. 767/ 2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 303(2)
2 नगर तालुका 594/ 2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 303(2)
3 शिर्डी 195/ 2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 305(D), 331(4)
4 राहुरी 703/ 2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे क . 331(3),305(A),324(4)
5 लोणी 405/ 2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 305(D), 331(4)
6 लोणी 484/ 2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 305(B), 331(2)
7 श्रीरामपूर तालुका 361/ 2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 305, 331(4)
8 घारगांव 260/ 2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 334(1)
ताब्यातील आरोपी नामे 1) दिपक रावसाहेब कचरे, वय- 24 वर्षे, 2) किरण बाळासाहेब राऊत, वय- 20 वर्षे, 3) अजय उर्फ लाल्या वसंत बनसोडे, वय- 18 वर्षे, सर्व राहाणार नेहरुनगर, लोहगाव, ता. राहाता, जि. अहिल्यानगर आणि एकुण 32,060/- रुपये किमंतीचा जप्त केलेला मुद्देमाल नगर तालुका पो.ठाणे येथे जमा करण्यात आला असून, पुढील तपास नगर तालुका पो.ठाणे करत आहेत.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
