ज्ञान हेच सामर्थ्य ते वाचनाने प्राप्त करावे: प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री ढोकेश्वर कॉलेज, टाकळी ढोकेश्वर. महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना महाविद्यालयाचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. लक्ष्मणराव मतकर यांनी आजच्या काळात ज्ञान हेच सामर्थ्य आहे व ते प्राप्त करावयाचे असेल तर विद्यार्थ्यांनी सातत्याने वाचत राहिले पाहिजे असे अवाहन केले.
कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाची प्रथम वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी कु. कातोरे जयश्री संतोष यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. वीरेंद्र धनशेट्टी यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जावे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात भेट देऊन विविध ग्रंथांची ओळख करून घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. शुभांगी पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. जिजाभाऊ घुले यांनी तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मण कोठावळे यांनी संत जनाबाई यांच्या वाचनाचे महत्व सांगणारे “वाचावी ज्ञानेश्वरी । डोळा पहावी पंढरी ।।१।।ज्ञान होय अज्ञानासी । ऐसा वर त्या टीकेसी ।।२।।ज्ञान होय अति मुढा ।अति मूर्ख त्या दगडा ।।३।।वाचील जो कोणी । जनी त्यासी लोटांगणी ।।४।।“ या अभंगाने कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले.
