Type Here to Get Search Results !

राहुरी - दिलीप वाघ या तरुणाला लोखंडी पाईप व लाथा बूक्क्यांनी मारहाण

 दिलीप वाघ या तरुणाला लोखंडी पाईप व लाथा बूक्क्यांनी मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


गाडी बाजूला काढतो, शिवीगाळ करु नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी दिलीप वाघ या तरुणाला लोखंडी पाईप व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दि. २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 


दिलीप सर्जेराव वाघ, वय २८ वर्षे, रा. वांबोरी डोंबारी, वस्ती ता. राहुरी, या तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. २४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजे दरम्यान दिलीप वाघ हा तरुण वांबोरी येथील डोंबारी वस्ती सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे त्याच्या गाडीत साहित्य भरत होता. 


त्यावेळी तेथे आरोपी आले व गाडी काढण्यास सांगितली. तेव्हा दिलीप वाघ त्यांना म्हणाला कि, आमचे साहित्य भरून झाले की लगेच गाडी बाजूला काढतो. असे बोलला असता आरोपींना त्याचा राग आल्याने त्यांनी शिविगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा दिलीप वाघ त्यांना म्हणाला, शिविगाळ करू नका, गाडी बाजूला काढतो.


त्यावेळी आरोपींनी दिलीप वाघ याला लोखंडी पाईप व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तेव्हा दिलीप वाघ याला सोडवण्यातकरिता आलेले चंदर जाधव, राधिका जाधव, सपना वाघ हे आले असता त्यांनाही आरोपींनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ केली. व जीवे मारण्याची धमकी दिली. 


दिलीप सर्जेराव वाघ याच्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात आरोपी रतन यशवंत वाघ, राहुल यशवंत वाघ, ज्ञानेश्वर यशवंत वाघ, अविनाश राजेंद्र वाघ, श्याम यशवंत वाघ, सर्व रा. डोंबारी वस्ती, वांबोरी, ता. राहुरी, या पाच जणांवर गुन्हा रजि. नं. ११५५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३५२, ३५१ (२), ११५ (२), १९१ (३), १९१ (२), १९०, १८९ (४), १८९ (२), ११८ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.