शंकरराव पगारे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उप नगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांचे वडील शंकरराव पगारे, वय ८१ वर्षे यांचे बुधवार दिनांक २१ जानेवारी रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पगारे कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शंकरराव पगारे हे समाजप्रिय, मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. सामाजिक व कौटुंबिक जीवनात त्यांनी नेहमीच सुसंस्कारांची जपणूक केली. त्यांच्या जाण्याने पगारे कुटुंबासह नातेवाईक, मित्र परिवारातून शोक व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उप नगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे, अरुण पगारे व रावसाहेब पगारे यांचे ते वडील होत. शंकरराव पगारे यांच्या निधना बद्दल विविध सामाजिक, राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
