Type Here to Get Search Results !

राहुरी - शाळकरी मुलांनी भरवला आठवले बाजार

 शाळकरी मुलांनी भरवला आठवले बाजार.



बाल आनंद मेळावा ठरला गावकऱ्यांसाठी शिकवण देणारा आठवडे बाजार.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील काळे आखाडा येथील नगर परिषदेची नूतन मराठी शाळा नं. ११ या शाळेच्या आवारात बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बालकांनी थेट बाजारच भरवला. इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाजीपाला, फळे, खाद्य पदार्थ व शालेय साहित्याची दुकाने थाटत व्यवहार ज्ञानाचा जिवंत धडा गावकऱ्यांसमोर मांडला.


चिमुकल्या व्यापाऱ्यांच्या उत्साहाने शाळेचे आवार अक्षरशः आठवडे बाजारात रूपांतरित झाले होते. मेळाव्याचे उद्घाटन नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले.


या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थी केवळ विक्रेते नव्हते, तर आत्मविश्वासाने व्यवहार करणारे उद्याचे नागरिक म्हणून दिसून आले. खरेदी-विक्री करताना मुलांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद पाहून कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई व नगरसेवकांसह गावकरीही भारावून गेले. नागरिक, दुकानदार, पालक, महिला, इतर शाळांच्या उपस्थित शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात खरेदी करून या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय ठरली.


यावेळी बोलताना नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे म्हणाले की, बाल आनंद मेळावा हा केवळ कार्यक्रम न राहता ‘शिकत खेळत व्यवहार’ या संकल्पनेचा ठोस प्रत्यय ठरला. प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञान, आत्मनिर्भरतेची जाणीव व अंगभूत कलागुणांना वाव देण्याचा उद्देश या उपक्रमातून साध्य झाला.विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता व्यवहारिक ज्ञान घेणे महत्वाचे आहे. आपल्या शाळेने जो बाल आनंद मेळावा घेतला तो प्रत्येक शाळेमध्ये आयोजित केला गेला पाहिजे जेणेकरून विद्यार्थी वर्गास व्यावहारिक ज्ञानाचे धडे अनुभवायला मिळतील असे मत यावेळी मोरे यांनी व्यक्त केले.   

   

यावेळी कार्यक्रमास नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उप नगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सागर तनपुरे, प्रतीक तनपुरे, प्रशांत डौले, नगरसेविका मनिषा भोंगळ, रविंद्र आहेर, सचिन भोंगळ, डॉ. विलास गुंजाळ, सदाशिव गुंजाळ, रखमाजी घाडगे, राणूजी सरोदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गिताराम काळे, उपाध्यक्ष योगिता शेटे, सय्यद भाऊसाहेब, विद्यार्थी सुरक्षा समिती अध्यक्षा योगिता गुंजाळ, मुख्याध्यापक किरण आंबुसकर सर, सागर घालमे सर व मंडळातील शाळांचे मुख्याध्यापक भोजने मॅडम, कावरे मॅडम व मनोज पालवे, अमोल लांबे सर,शिक्षक, पालक, ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी व युवा वर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.