Type Here to Get Search Results !

राहुरी - एलिमेंटरी व इंटरमिजिएट दोन्ही ग्रेडमध्ये १०० टक्के निकाल

 एलिमेंटरी व इंटरमिजिएट दोन्ही ग्रेडमध्ये १०० टक्के निकाल.



शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिरची उज्वल परंपरा कायम.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


महाराष्ट्र शासनाच्या कला संचनालय मुंबई बोर्डा मार्फत २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये राहुरी येथील कै. लालाशेठ बिहाणी विद्यामंदिर प्रशालेने यंदाही १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम राखली आहे. सातत्यपूर्ण मेहनत, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मिळालेला योग्य वाव यामुळे शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.


एलिमेंटरी ग्रेड परीक्षेसाठी एकूण ३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण होत १०० टक्के निकालाची नोंद झाली. यामध्ये अ श्रेणीमध्ये आराध्या हरिश्वर साळवे, अदिती चंद्रमणी गायकवाड, देवकीनंदन प्रशांत जोशी, गौरी संतोष गायकवाड, जुईली भीमराज शेळके, प्रणव सचिन गायकवाड व सोहम शिवाजी शिरसाठ या सात विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता मिळवली. ब श्रेणीमध्ये अक्षरा नीलकंठ मंडलिक, गौरव भारत कोहकडे, खुशी बाळासाहेब वराळे, मानसी मयूर शेळके, मसीरा मोहसीन शेख, ऋषिकेश राजेंद्र पिंपळे, साई अशोक कोहकडे, कृष्णा संदीप देशमुख, साई दीपक कोल्हे, शिवम राधेश्याम यादव, श्रेया किरण शिंदे, श्रुती अनिल धनवडे व तोफिक जब्बार शेख असे १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.


इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतही शाळेने १०० टक्के निकालाची कामगिरी केली. या परीक्षेसाठी १८ विद्यार्थी बसले होते. आणि सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अ श्रेणीमध्ये आयशा राजू शेख, भक्ती मनोज अडसुरे, हर्षद तुषार काळे, ईश्वरी अशोक कोहकडे, रेणुका सुभाष शिरसाठ, समृद्धी महेश जगताप, स्नेहल देविदास तांदळे व विनय संजय अढांगळे यांनी यश संपादन केले. ब श्रेणीमध्ये अमोल भारत परंजने हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला.


या यशात शाळेचे कलाशिक्षक समीर शेख व सतीश गुलदगड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा प्रभावतीताई बिहाणी, सचिव मनोजशेठ बिहाणी, सहसचिव अनुपशेठ बिहाणी, मुख्याध्यापक कैलास अनाप, उप मुख्याध्यापिका मंजिरी देशपांडे, पर्यवेक्षक राहुल जगताप तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.