Type Here to Get Search Results !

राहुरी - शिवीगाळ करुन ऊसतोड बंद केली, सात जणांवर गुन्हा दाखल.


 


शिवीगाळ करुन ऊसतोड बंद केली, सात जणांवर गुन्हा दाखल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


ऊस तोडणीला विरोध करुन आरोपींनी कुसुम कदम व त्यांच्या कुटुंबाला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. ही घटना राहुरी तालुक्यातील मोकळ ओहळ येथे दि. ९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. 


कुसुम अनिल कदम, वय ४५ वर्षे, धंदा शेती, रा. मोकळ ओहळ, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, कुसुम कदम यांची मोकळ ओहळ शिवारात शेती असुन सदर शेजारी मंगल दत्तात्रय कदम यांची शेती आहे. सदर शेती गटावरुन दोन्ही कुटुंबात नेहमी वाद होत असतात. शेती वरुन राहुरी येथील न्यायालयात दावा चालु आहे.


दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान कुसुम कदम यांच्या शेतात ऊस तोडणी चालु होती. तेथे आरोपी आले व म्हणाले की, तुम्ही येथे उस तोडणी का करता. तेव्हा कुसुम कदम यांचे पती त्यांना म्हणाले की, हा शेती गट आमचा आहे, तेव्हा आम्ही त्यामध्ये लावलेला ऊस तोडणी करत आहोत.


असे म्हणाले असता आरोपींनी कुसुम कदम यांची गचांडी धरुन लोटुन दिले. तेव्हा त्यांचे पती व मुलगा भांडण सोडविण्यसाठी आले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच ऊस तोडणी बंद केली. 


कुसुम अनिल कदम यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तात्रय शंकर कदम, बाळासाहेब शंकर कदम, विक्रम दत्तात्रय कदम, भारत बाळासाहेब कदम, मंगल दत्तात्रय कदम, मिराबाई बाळासाहेब कदम, शरद दत्तात्रय कदम,  सर्व रा. मोकळ ओहळ, ता. राहुरी, या सात जणांवर गुन्हा रजि. नं. ३२/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२), १९१ (१), १९०, ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.