. सतिष गोलवड हा तरुण गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता
सदर तरुण कोठे आढळून आल्यास राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा- राहुरी पोलीस ठाणे.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील सतिष गोलवड हा तरुण गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता झाला आहे. सदर तरुणा बाबत कोणाला काही माहिती असल्यास राहुरी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन तपासी अधिकारी यांनी केले.
"सतिष ज्ञानेश्वर गोलवड", वय १९ वर्षे, रा. मुसळवाडी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर, हा तरुण दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी राहत्या घरातून अचानकपणे बेपत्ता झाला आहे. या घटने बाबत अनिता ज्ञानेश्वर गोलवड, रा. मुसळवाडी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात हरवील्याची तक्रार दाखल केली आहे.
सदर घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हनुमंत आव्हाड हे करीत आहे. सदर तरुण रंगाने काळा सावळा, उंची ५ फुट, केस काळे, चेहरा गोल, शरिर बांधा मजबुत, अंगात निळया रंगाचा शर्ट, काळया रंगाची जिन्स पॅन्ट, पायात पाढऱ्या रंगाचे बुट आहेत.
सदर तरुण कोठे आढळून आल्यास किंवा त्याच्या बद्दल काही माहिती असल्यास तपासी हवालदार हनुमंत आव्हाड मो. नं. ९३५९३२९८३१, अनिता गोलवड, मो. नं. ७०८३१२५२७२, राहुरी पोलीस ठाणे नं. ०२४२६- २३२४३३ या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन राहुरी पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले.
