Type Here to Get Search Results !

राहुरी - ६ मार्च रोजी नगरपरिषद कार्यावर धरणे आंदोलन.- पाणी पट्टी वाढ संदर्भात नगरपरिषद कार्यावर धरणे आंदोलन करणार- सुनिता थोरात.


 


६ मार्च रोजी नगरपरिषद कार्यावर धरणे आंदोलन.


पाणी पट्टी वाढ संदर्भात नगरपरिषद कार्यावर धरणे आंदोलन करणार- सुनिता थोरात.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्टी १ हजार ८०० रुपयांवरून थेट ३ हजार रुपये इतकी वाढ करण्याचा बेकायदेशीर, अन्यायकारक व नागरिक विरोधी निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, यासाठी नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेला पाणीपट्टी दर १ हजार ८०० रुपयांवरून थेट ३ हजार रुपये करण्याचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी लक्षात न घेता, लोकशाही मूल्यांना तिलांजली देत व जनतेवर जबर आर्थिक बोजा टाकणारा असून, तो पूर्णतः अन्यायकारक, अव्यवहार्य व निषेधार्ह आहे.


नगर परिषद हद्दीतील नागरिक आधीच महागाई, बेरोजगारी, वीज दरवाढ व विविध करभारामुळे त्रस्त असताना पाणीपुरवठा हा मूलभूत हक्क असताना त्यावर अशी अमर्याद दरवाढ करणे म्हणजे नागरिकांच्या संयमाची जाणीवपूर्वक परीक्षा घेण्याचा प्रकार आहे. असे नगरसेविका सुनीता सुरेंद्र थोरात यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.