Type Here to Get Search Results !

पुणे - माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या शुभहस्ते केळेवाडीच्या सानिकाचा राष्ट्रीय कराटे विजयाचा गौरव

 माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या शुभहस्ते केळेवाडीच्या सानिकाचा राष्ट्रीय कराटे विजयाचा गौरव



पुणे प्रतिनिधी: पुणे येथील सानिका भंडारी हिने बारामती येथे दिनांक 27 ते 29 जानेवारी दरम्यान पार पडलेल्या 69 व्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत संपूर्ण देशात प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्र राज्याचा गौरव वाढविला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्या शुभहस्ते सानिका भंडारी हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी सानिकाच्या मेहनतीचे कौतुक करत तिच्या भावी क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 सानिका ही चॅम्पियन कराटे क्लब, वसुधा फाउंडेशन हॉल, केळेवाडी येथे नियमित सराव करत असून तिला मुख्य प्रशिक्षक शुभम बने तसेच सहाय्यक प्रशिक्षक प्रसाद वाघमारे व साक्षी तांदळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

तसेच प्रभागाचे नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी स्पर्धेच्या तयारीपासून ते प्रत्यक्ष सहभागापर्यंत  सानिकाला योग्य मार्गदर्शन व वेळोवेळी सहकार्य केले, अशी माहिती प्रशिक्षक शुभम बने यांनी दिली.

सानिकाच्या या नेत्रदीपक यशामुळे केळेवाडी परिसरासह पुणे शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.