Type Here to Get Search Results !

राहुरी - सोसायटी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांसाठी कामधेनू ठरली- अरुण तनपूरे

 सोसायटी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांसाठी कामधेनू ठरली- अरुण तनपूरे.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


माध्यमिक सोसायटीच्या माध्यमातून सर्व सभासदांना आर्थिक स्थैर्य मिळते. ही सोसायटी शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांसाठी कामधेनू ठरली. या संस्थेचा एक टक्का व्याजदर कमी करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. असे प्रतिपादन डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन तसेच मार्केट कमिटीचे चेअरमन अरुण तनपुरे यांनी व्यक्त केले आहे. 


माध्यमिक शिक्षक सोसायटी अहिल्यानगर यांच्या वतीने राहुरी तालुक्यातील सभासदांचा कृतज्ञता निधी सोहळा व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक समारंभ रविवार दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर तनपुरे कारखान्याचे चेअरमन तथा मार्केट कमिटीचे अध्यक्ष अरुण तनपुरे हे होते.


तसेच यावेळी राहुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे माध्यमिक सोसायटीचे माजी चेअरमन दत्तात्रय पानसंबळ संचालक तथा विवेकानंद नर्सिंग होम चे उपाध्यक्ष भारत वारुळे कारखान्याचे संचालक गणेश उर्फ जनार्दन गाडे राहुरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव मनोज बिहानी उपस्थित होते.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण साहेब तनपुरे यांनी सांगितले की माध्यमिक शिक्षक सोसायटी सर्व सभासदांची कामधेनू आहे. यासारखी संस्था जिल्ह्यामध्ये असणे हेच या सभासदांचे भाग्य आहे. आम्ही जिल्हा बँकेच्या स्तरावर संस्थेला सर्वतो परी सहकार्य करण्याचे प्रयत्न करू व आपल्याला मिळणाऱ्या सीसी वर व्याजदर कमी करण्याचा प्रयत्न करू.


यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी सांगितले की, मी सामान्य शिक्षक असताना मला या संस्थेच्या आधारामुळे माझ्या कुटुंबामध्ये प्रगती करण्यासाठी भांडवल प्राप्त झाले. त्यामुळे माझ्या सारखे अनेक कुटुंब आज सुखी आहे. ही संस्था शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार देऊन त्यांना त्यांच्या आर्थिक संकटांमधून मुक्त करणारी संस्था आहे. संस्थेच कारभार सध्या योग्य संचालक मंडळाच्या हातामध्ये आहे. त्यामुळे या संस्थेची प्रगती अटळ आहे. 


यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले की, आमची सत्ता आल्या नंतर अनेकांनी वेगवेगळ्या वल्गना केल्या. मात्र आम्ही मागचे देणे देखील आज देत आहोत सभासदांनी जो विश्वास आमच्यावर टाकला आहे त्यास आम्ही नक्कीच पात्र राहू. 


यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब शिंदे, व्हा. चेअरमन अर्जुन वाळके, संचालक संभाजी राजे गाडे, संचालक सुनील दानवे, उमेश गुंजाळ, महेंद्र हिंगे, राजेंद्र कोतकर, साहेबराव रक्टे, प्रशांत होन, सुरज पाटविसावे, किशोर धुमाळ, सुधीर कानवडे, बाजीराव अनुभुले, छबुराव फुंदे, माजी संचालक नंदकुमार दिघे, कल्याण ठोंबरे, सुरेश मिसाळ, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सर्जेराव पेरणे, शिक्षक संघटनेचे नेते ज्ञानदेव नालकर, माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव आदि सह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव स्वप्नील इथापे, शाखाधिकारी भरत बेरड, लिपिक सागर रोकडे, लिपिक प्रमोद फलके, सेवक महेश सोनवणे आदींनी विशेष प्रयत्न घेतले. आभार संभाजी राजे गाडे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश जगदाळे सर व पत्रकार गणेश विघे यांनी केले.