Type Here to Get Search Results !

शिर्डी येथील हॉटेलमधुन टि.व्ही.चोरणारा 01 आरोपी मुद्देमालासह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.



 


क्रमांक: पीआरओ/प्रेसनोट/110/2026 प्रेस नोट दिनांक :- 17/04/2026

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिर्डी येथील हॉटेलमधुन टि.व्ही.चोरणारा 01 आरोपी मुद्देमालासह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, फिर्यादी विलास  मारुती डोंगरे रा. निसर्ग ग्रीन प्रकल्प बी. कँबीन रोड, अंबरनाथ पुर्वजि. ठाणे यांचे हॉटेल साई पंचम निमगाव ता. राहाता येथे दिनांक 20/03/2026 ते दिनांक 01/04/2026 रोजीचे दरम्यान कोणतीतरी अज्ञात  इसमांने हॉटेलचे दरवाज्याचे कडीकोयंडा तोडुन हॉटेलमधील सॅमसंग कंपनीचे एलईडी टीव्ही, 33 नळ, मिस्कर व इतर असे एकुण 4,35,000/-रु किमतीचे मुद्देमाल चोरुन नेले आहे. सदर घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाणे गु. र. नं. 221/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331(4), 305(अ), 331(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यात मोटार सायकल चोरीच्या घटना वाढल्याने श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पो.नि. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्ह्यातील घरफोडी गुन्ह्यातील आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश दिलेले आहेत.

नमुद आदेशान्वये पो.नि. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/दिपक मेढे, व पोलीस अंमलदार  राहुल द्वारके, फुरकान शेख, राहुल डोके, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड, सतिष भवर यांचे पथक तयार करुन घरफोडी  गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेवुन गुन्हे उघडकीस आणणे बाबत आवश्यक सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना केले. 

दि.16/04/2026 रोजी पथक घरफोडी चोरीच्या गुन्हयातील आरोपी माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारामार्फत नमुद गुन्हा इसम नामे विशाल त्रिभुवन रा. निमगाव ता. राहाता याने त्याचे साथीदारा सोबत केला असुन तो त्याचे घरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने निमगाव शिवारातील विशाल त्रिभुवन याचे राहते घरी जावुन त्याचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) विशाल बाळू त्रिभुवन वय-26 वर्षे रा. मल्हारनगर, निमगांव ता. राहाता असे असल्याचे सांगितले. पथकाने विशाल त्रिभुवन यास सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सागितले सदरचा गुन्हा मी व माझे साथीदार नामे 2) प्रमोद उर्फ बंड्या सुधाकर पवार रा. दिल्ली साईट, साईबाबा संस्थान खोल्या शिर्डी ता.राहाता (फरार)अशानी मिळुन केल्याची कबुली दिली आहे.

आरोपीचे सांगणेवरुन 56,000/-रु कि.चे 32 इंचाचे काळे रंगाचे एकुम 08 एलईडी टि.व्ही मुद्देमाल हस्तगत केले आहे.

ताब्यातील आरोपी मुद्देमालासह शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयाचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. 

सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.