ठेकेदाराची २ लाख ८० हजारची फसवणूक.
कामावर जाण्यासाठी उचल घेऊन कामावर गेले नाही, आठ जणांवर गुन्हा दाखल.
*राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
ऊस तोडणी मजूरांनी ठेकेदाराकडून लाखो रुपए घेतले. मात्र पैसे घेऊन देखील ते कामावर गेले नाहीत. ठेकेदाराच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आठ जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पांडुरंग रावसाहेब काकडे, वय ४२ वर्षे, धंदा शेती, रा. चिखलठाण, ता. राहुरी, यांना सन २०२४- २०२५ या हंगामासाठी ऊस तोडणी करिता मजुराची आवश्यक्ता असल्याने त्यांनी आरोपींना ऊस तोडणी मजुर म्हणुन कामावर घेतले. ११ ऑक्टोबर २०२४ रोजी दोन जणांना प्रत्येकी २० हजार रुपए व सहा जणांना प्रत्येकी ४० हजार रुपए असे एकूण २ लाख ८० हजार रुपए नोटरी करुन दिले.
पैसे घेऊन देखील आरोपी कामावर गेले नाही. ठेकेदाराला वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांची फसवणूक केली. त्यानंतर पांडुरंग रावसाहेब काकडे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
त्या फिर्यादीवरून आरोपी युवराज राजु तांबे, अर्चना युवराज तांबे, संतोष अर्जुन सोनवणे, मिरा मारुती शिनगारे, आबासाहेब नामदेव विरकर, गणेश रखाजी गावडे, मोईन आमिर शेख, सर्व रा. डिग्रस, तसेच सुनिल नाना माळी, रा. मांजरी, ता. राहुरी, या आठ जणांवर गुन्हा रजि. नं. ३१४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (२), ३१६ (२), ३ (५) प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
