मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये 38 वर्षीय रुग्णाला नवजीवन
तीव्र हृदयविकाराचा झटका व कार्डियाक अरेस्टनंतर आपत्कालीन अँजिओप्लास्टीने मिळाला जीवदान
पुणे प्रतिनिधी: Medicover Hospitals, Bhosari येथे 38 वर्षीय रुग्णाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना उल्लेखनीय यश मिळाले आहे. तीव्र हृदयविकाराचा झटका (मॅसिव्ह हार्ट अटॅक) आणि कार्डियाक अरेस्टसारख्या जीवघेण्या स्थितीत असलेल्या या रुग्णावर आपत्कालीन अँजिओप्लास्टी आणि अत्याधुनिक अतिदक्षता उपचारांद्वारे यशस्वी उपचार करण्यात आले.
सुरुवातीला रुग्णावर दुसऱ्या रुग्णालयात उपचार सुरू होते, जिथे कार्डियाक अरेस्टमुळे त्याला सीपीआर आणि डिफिब्रिलेशन देण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक खालावत जाऊन कार्डिओजेनिक शॉक निर्माण झाल्याने त्याला तातडीने कार्डियाक अॅम्ब्युलन्सद्वारे मेडिकव्हर हॉस्पिटल्स, भोसरी येथे हलवण्यात आले.
रुग्णालयात दाखल होताना रुग्णाची अवस्था अत्यंत गंभीर होती. त्याचा रक्तदाब आणि नाडी मोजता येत नव्हती. तात्काळ व्हेंटिलेटर आणि इनोट्रोपिक सपोर्ट देत उपचार सुरू करण्यात आले.
आपत्कालीन कोरोनरी अँजिओग्राफीमध्ये हृदयाच्या Left Anterior Descending (LAD) धमनित मोठा रक्ताचा थक्का आढळून आला. त्यानंतर Dr. Prashant Sadashiv Shinde यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञ कार्डिओलॉजी टीमने तातडीने Primary Percutaneous Coronary Intervention (PTCA) करत रक्तप्रवाह पूर्ववत केला.
