नेवासा - गोळीबार करणाऱ्यास गावठी कट्टयासह अटक
Vo.... नेवासा तालुक्यातील पिंपरी शहाली येथे बैलगाडा शर्यती नंतर गोळीबार करणाऱ्या एकाला गावठी कट्टयासह नेवासा पोलिसांनी अटक केली. सुयश नानासाहेब नवथर (रा. पिंपरीशहाली) याने १० मे रोजी पिंपरीशहालीत बैलगाडा शर्यत संपल्यानंतर त्याच्याकडील गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याने स्वतःच्या उजव्या पायाच्या घोट्याला गोळी लागून तो जखमी झाला होता. नवथर हा गावठी कट्टयासह पिंपरी शहाली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यास पोलिस निरीक्षक सागर ढिकले, उपनिरीक्षक विकास पाटील, सुमित करंजकर, नारायण डमाळे, अतुल शेळके, कैलास म्हैसमाळे यांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून, पोलिस कॉन्स्टेबल नारायण डमाळे यांनी फिर्याद दिली आहे.
