Type Here to Get Search Results !

शिक्रापूर - तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात बी.एससी डेटा सायन्स आणि बी.एससी कॉम्प्युटर अभ्यासक्रमास शासनाची मान्यता


 तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात बी.एससी डेटा सायन्स आणि बी.एससी कॉम्प्युटर अभ्यासक्रमास शासनाची मान्यता. 

.........................................

प्रतिनिधी सुनिल पिंगळे शिक्रापूर 


तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत बी.एससी (डेटा सायन्स) आणि बी.एससी कम्प्युटर  या दोन अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली असल्याची माहिती  शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक महेशबापू ढमढेरे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी दिली. 

शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांतभाऊ सातपुते, ज्येष्ठ संचालक विजूकाका ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे यांनी वरील अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्याच प्रयत्नांचे यश म्हणून 

वरील अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आहे. याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ३० जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार वरील मान्यता महाविद्यालयास  प्राप्त झाली आहे . 

चालू शैक्षणिक वर्ष म्हणजेच २०२६-२७ पासून साहेबराव शंकरराव ढमढेरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये वरील दोनही अभ्यासक्रम  सुरू होत आहेत. याबाबतची प्रवेश नियमावली लवकरच महाविद्यालयाच्या वतीने जाहीर केली जाणार असून तळेगाव ढमढेरे व पंचक्रोशीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वरील अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यावा असे आवाहनही शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने विद्यार्थी व पालकांना करण्यात आले आहे. 

याबाबत सविस्तर माहिती देताना संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे, प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे आणि उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास अनुसरून काळाशी सुसंगत असलेले बी.एससी (डेटा सायन्स) आणि बी.

एससी कॉम्प्युटर आणि हे अभ्यासक्रम असणार आहेत. त्यासाठीच्या आवश्यक त्या पायाभूत सुविधा महाविद्यालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या असून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शिक्षण प्रसारक मंडळाचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे. महाविद्यालयात सध्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेबरोबरच बी. बी. ए (सीए), पदव्युत्तर स्तरावरील एम.

 ए. इतिहास आणि एम. कॉम हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.  वरील अभ्यासक्रमाचे शिक्षणही दर्जेदार पद्धतीने महाविद्यालयात दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.  माफक अभ्यासक्रम शुल्क, गुणवंत शिक्षक आणि चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा हे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय सर्व प्रकारच्या शासकीय शिष्यवृत्ती योजना महाविद्यालयात प्रभावीपणे राबविल्या जात असून महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने अनेक योजना आणि उपक्रम राबवण्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय सातत्याने अग्रेसर असल्याचे प्राचार्य डॉ . अर्जुन मुसमाडे आणि उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनी सांगितले. 

चालू शैक्षणिक वर्षापासून नव्याने सुरू होत असलेल्या बी.एससी डेटा सायन्स आणि बी.एससी कॉम्प्युटर या अभ्यासक्रमांची एकूण प्रवेश क्षमता ८० जागांची असून  विद्यार्थ्यांनी तातडीने महाविद्यालयामध्ये येऊन प्रवेश प्रक्रियेविषयी माहिती घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.