श्रीगोंदा- NEET पेपरफुटी प्रकरणावर काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन विद्यार्थ्यांवरील लाठीमाराचा निषेध; दाखल गुन्हे मागे घेण्याची ठिय्या आंदोलन.....
श्रीगोंदा | प्रतिनिधी
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस लाठीमाराचा निषेध करत तसेच आंदोलनातील विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी श्रीगोंदा तहसीलदारांना देण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत दत्तात्रय ओगले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार व बळाच्या वापराचा निषेध व्यक्त करत संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई करावी, तसेच देशभरातील आंदोलनांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
यावेळी श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संतोष भोयटे ,महिला कॉंग्रेस अध्यक्षा सौ सुनीता दरवडे, अँड समित बोरुडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री विकास काळे, शहाजी खेडकर- चेअरमन ,मुजफ्फर मालजप्ते , डॉ. गोरख बायकर,सचिन गायकवाड संतोष बायकर,सोहेल शेख, प्रवीण ढगे
सूरज शेख,योगेश शेळके
अफ्रिद इनामदार, विलास पाटील नलगे,संतोष नलगे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
