पुणे प्रतिनिधी: नगरसेविका वृषाली चौधरी व शेठ ताराचंद हॉस्पिटल यांच्या सहकार्याने कर्वेनगर येथील वडार वस्ती येथे नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये 772 नागरिकांनी डोळ्याची तपासणी केली तर 440 नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी जवळजवळ 36 रुग्णांचे मोतीबिंदूचे निदान झालेले असून यांचे मोफत शस्त्रक्रिया पुढील आठवड्यात होणार आहे. या शिबिराला नगरसेवक राजेश बराटे,नगरसेवक सुशील मेंगडे, शिवराम मेंगडे, विठ्ठल बराटे, दत्तात्रय चौधरी, बापूसाहेब मेंगडे हॉस्पिटलचे किरण कड, तसेच चिदानंद प्रतिष्ठान, साईनाथ तरुण मंडळ, युवा प्रतिष्ठान मधील भाजप पदाधिकारी उपस्थित होते