पुणे,प्रतिनिधी: पुण्याच इतिहास स्वातंत्र्याआदि पासून आहे या शहरामध्ये मोठे- मोठे वैज्ञानिक अर्थशास्त्री विचारवंत लोक आहेत यामुळेच पुण्याची ओळख ही बुद्धीमान लोकांचे शहर अशी आहे . प्रसिद्ध पत्रकार आणि द प्रिंट एंड होस्टचे संस्थापक पद्मभूषण शेखर गुप्ता यांनी हे विचार व्यक्त केले. रेसिडेन्सी क्लब द्वारा आयोजित पुणे प्राईड अवॉर्ड कार्यक्रमात ते बोलत होते.
रेसिडेन्सी क्लब ने त्यांचे २८ वे वर्ष हे एका अनोख्या पद्धतीने साजरे केले . त्यांनी "पुणे'ज प्राईड अवॉर्ड"चे वितरण करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या पुरस्काराने त्या लोकांना पुरस्कृत करण्यात आले जे त्यांच्या थोर कामगिरी साठी परिचित आहे.
प्रदीप भार्गव यांना कॉर्पोरेट कॅटेगरी मध्ये त्यांच्या अविस्मरणीय कामगिरी साठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यांना ग्राहक ,औद्योगिक आणि ऊर्जा या तीनही क्षेत्रात दीर्घ काळाचा अनुभव आहे.कमिन्समध्ये आपल्या कार्याची सुरवात करण्या पूर्वी त्यांनी अणु ऊर्जा आयोग, भेल, भारत फोर्ज ग्रुप आणि जनरल इलेक्ट्रिक यांच्याबरोबर काम केले आहे.
लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार नितीन देसाई यांना प्रदान करण्यात आला ज्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन हे शिक्षण, वैद्यकीय आणि धर्मादाय क्षेत्रात गरीब आणि गरजूंना समर्पित केले आहे. ते दृष्टिहीन व शैक्षणिक विश्वस्त व शाळा यासाठी धर्मादाय रुग्णालये चालवितात.
पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर
पुरस्कार:
· लाईफ टाइम: नितीन देसाई
· कॉर्पोरेट: प्रदीप भार्गव
· सोशल वर्क : रितु छाबरिया
· आर्ट अँड कल्चर : मुरली लाहोटी
· अकॅडमिक : प्रोफेसर. उत्तम भोईटे
· स्पोर्ट : नितीन कीर्तने