Type Here to Get Search Results !

नेवासा - जलसंधारणमंत्री ना. शंकरराव गडाख यांनी पोलीस सुरक्षा नाकारली. | C24TAAS |


नेवासा - जलसंधारणमंत्री ना. शंकरराव गडाख यांनी पोलीस सुरक्षा नाकारली. | C24TAAS |



नेवासा - संचारबंदीच्या काळात सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेवरील वाढता ताण लक्षात घेता मृद व जलसंधारणमंत्री नामदार शंकरराव गडाख यांनी स्वत: आपली पोलीस सुरक्षा हटविण्याचे पत्र नगर जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे. देश व राज्य कोरोनाचा संकटाचा सामना करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रहितासाठी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे माझ्या सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलीस वाहन कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनेत वापरण्यास परवानगी देत असल्याचे पत्राद्वारे शंकरराव गडाख यांनी सांगितले आहे. कोरोनामुळे सुरक्षा यंत्रणेवरील वाढता ताण पाहता आपण सुरक्षा हटविण्याचा निर्णय घेत असल्याचे गडाख यांनी पत्रात म्हटले आहे.