Type Here to Get Search Results !

नेवासा - गरजूंना किराणा व धान्याचे वाटप, भाजप तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांचा उपक्रम. | C24TAAS |

नेवासा - गरजूंना किराणा व धान्याचे वाटप, भाजप तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांचा उपक्रम


नेवासा - भाजप स्थापना दिनाचे औचित्य साधून नेवासा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेवासा शहर व परिसरात आदिवासीसह गरजूंना किराणा व धान्याचे वाटप करण्यात आले.भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
    कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत असतांना लोकडाऊनमुळे हातावरचे पोट असणाऱ्यांची आज मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे ही वास्तवता लक्षात घेऊन भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी स्व:खर्चाने नेवासा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मधील गरजूंना घरोघरी जाऊन किराणा साहित्य व धान्याचे वाटप केले. त्यानंतर प्रवरानदीच्या तीरावरच वास्तव्यास असलेल्या व उपासमार होत असलेल्या आदिवासी वसाहतीला नितीन दिनकर यांनी भेट दिली तिथे ही झोपडीमध्ये जाऊन किराणा व धान्य साहित्याचे वाटप केले.
     
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रम भाजपचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे,भाजपयुवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निरंजन डहाळे,मनोज पारखे,अजित नरुला,दिपक गायकवाड,विजय कोकणे,पप्पू गायकवाड, रोहित पवार यांचे या कामी मोलाचे सहकार्य लाभले.