Type Here to Get Search Results !

१४ तारखेनंतरही ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. | C24TAAS |

१४ तारखेनंतरही ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. | C24TAAS |


मुंबई – महाराष्ट्रातही लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावरून जनतेशी संवाद साधताना याची घोषणा केली. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्यामुळं लॉकडाऊनमध्ये वाढ गरजेचीच होती. राज्यात मुंबई, पुणे या शहरांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. मुंबईत सर्वाधिक कोरोना रुग्ण आणि पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक अशी परिस्थिती आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतीच्या कामावर कोणतंही लॉकडाऊन आणलं नाही, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहील. १४ एप्रिलनंतर कुठेही मला गोंधळ नको, या संकटाचा सामना महाराष्ट्र ध्येर्याने करत आहे. या संकटात देशाला आणि जगाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राला करायचं आहे. हा लॉकडाऊन कधीपर्यंत काळेल हे जनतेच्या हातात आहे. आपणचं कोरोना संक्रमित साखळदंड तोडला तर लॉकडाऊन लवकरच संपेल. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहील असं ते म्हणाले.

दरम्यान, घराबाहेर पडू नका, अत्यावश्यक असेल तर घराबाहेर मास्क लावून पडा. घरातील ज्येष्ठ, मुलांना जपा, त्यांच्यापर्यंत हा व्हायरस पोहचू देऊ नका, ही परिस्थिती नियंत्रणात आहे असं वाटत असलं तरी गाफील राहता कामा नये. या सोमवारी आपल्या राज्यात पहिला रुग्ण आढळून ५ आठवडे होतील. एकही कोरोनाग्रस्त आढळणार नाही याची मला खबरदारी घ्यायची आहे. कोरोना संक्रमित साखळी तोडायला वेळ लागेल. मग काय करायचं, कसं करायचं हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. काही ठिकाणी निर्बंध कठोर करायलाच लागतील. लोकांनी गर्दी करु नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.