Type Here to Get Search Results !

नेवासा- दूध,पाणी,मेडिकल,भाजीपाला,किरणा दुकानदारांची नाव, फोन नंबर यादी. | C24Taas |

नेवासा - दूध,पाणी,मेडिकल,भाजीपाला,किरणा दुकानदारांची नाव, फोन नंबर यादी.


नेवासा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात संपूर्ण दुकान बंद असणार त्यामुळे दुकानदारांमार्फत किराणा, दूध, पाणी, मेडिकल, भाजीपाला घरपोहोच केला जाणार आहे. नेवासा नगरपंचायतकडून तसे नियोजन केलं आहे.
5 दिवसाच्या संपूर्ण बंद काळात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोहोच देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. दूध,पाणी,मेडिकल,भाजीपाला,किरणा दुकानदारांना ओळखपत्र देणार आहे. दुकानदार  नागरिकांकडून  फोनवर यादी मागवून घेतील. त्यानुसार किराणा नागरिकांच्या घरी पोहोच होईल. किराणा घरपोहोच करणायांनाही तहसीलदारांकडून ओळखपत्र दिले जाईल. हे ओळखपत्र असणारे किराणा घरी पोहोच करण्याचे काम करतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दूध,पाणी,मेडिकल,भाजीपाला,किरणा दुकानदारांची नाव, फोन नंबर, यादी तयार करण्यात आली आहे. ही यादी सोशल मिडियावर प्रसिध्द साठी देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील काळात किराणा घरपोहोच करण्याची सुविधा करत असल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले.