नेवासा येथील आणखी १ व्यक्ती कोरोना बाधित.|C24Taas |
नेवासा - अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या अहवालापैकी ०२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित ३२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.
नेवासा येथील एका व्यक्तीचा १४ दिवसानंतरचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आज स्पष्ट झाले.
तर रुग्णाची संख्या ४ झाली आहे. त्यातील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे. तर उर्वरितवर उपचार चालू आहे.