तुळजापुर प्रतिनिधी:संपूर्ण जग आज कोरोनाविषाणू शी लढत आहे अशा संसर्गजन्य कठीण प्रसंगी आपले कुटुंब आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा बाजूला ठेवून व आपला जीव धोक्यात घालून केवळ सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, शहरासाठी, तालुक्यासाठी, समाजासाठी, आपले कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे निभावून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल म्हणुन पञकार सुरक्षा समितीच्या वतीने पञकार तथा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन ताकमोघे यांना कोरोना महायोद्धा पुरस्कार प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे प्रदेश सचिव डॉ.आशिषकुमार सुना यांच्या सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मिञ परिवारांनी अभिनंदनाचा वर्षाव केला..
सी २४तास प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद