नेवासा - वैष्णवीच्या खुनाचा गुन्हा उघडकीस करण्यात पोलिसांना यश. | C24Taas |
नेवासा - तालुक्यातील सौंदाळा येथील ९ वर्षाची वैष्णवी सोमनाथ आरगडे या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली मयत मुलीच्या आत्या भावाने दिली असून त्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी दिली. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आल्याने तो खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार,अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे,उपअधीक्षक मंदार जवळे,पोलिस निरीक्षक रणजित डेरे,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी सोमवार दि.२२ जुन रोजी आरोपी शोधण्यासाठी अथक प्रयत्न केले. अखेर त्यांनी सौंदाळा येथे मयत मुलीच्या आईवडिलांकडे आयटीआयचे शिक्षण घेण्यासाठी राहत असलेला मयत मुलीचा आत्याभाऊ आप्पासाहेब नानासाहेब थोरात.वय 22 वर्षे रा.आपेगाव,ता.पैठण याच्याकडे संशयित म्हणून चौकशी करत असताना त्याने वैष्णवीचा खून केल्याची कबुली दिली आहे. त्याला अटक करण्यात आली.अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी सांगितले.

( सविस्तर वृत्त पुढील बातमीमध्ये )