Type Here to Get Search Results !

अहमदनगर जिल्ह्यात आज आढळले १९ कोरोना बाधित.

अहमदनगर जिल्ह्यात आज आढळले १९ कोरोना बाधित.


आज ३० जुन रोजी दुपारी एकूण १९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथे ०३ व्यक्ती बाधित आढळून आल्या.
नगर शहरातील झारेकर गल्ली येथील ३२ वर्षीय व्यक्ती, बाग रोझा हडको येथील ३२ वर्षीय व्यक्ती, सुळके मळा येथील ३० वर्षीय पुरुष आणि २८ वर्षीय महिला, तोफखाना येथील ६ वर्षीय मुलगी, सिध्दार्थ नगर येथील ३८ वर्षीय पुरुष, माधवनगर कल्याण रोड येथील ४० वर्षीय महिला बाधित आढळून आली.
भिंगार येथील ३५ वर्षीय पुरुष,  ४९ वर्षीय पुरुष, ४० वर्षीय आणि ३८ वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. याशिवाय आलमगीर (भिंगार) येथील ३० वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आले आहेत.
श्रीरामपूर येथील ४८ वर्षीय पुरुष, पारनेर तालुक्यातील बाभूळ वाडी येथील ६२ वर्षीय पुरुष, जामखेड तालुक्यातील जायभाय वाडी येथील३२ वर्षीय व्यक्ती ( कल्याण वरून प्रवास करून आलेला) आणि शेवगाव तालुक्यातील आठेगाव येथील ३० वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांची संख्या: १२०
मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या: १४
जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या: ४४१
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३०७
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर)