नेवासा - गावठी कट्ट्यया सह दुसरा आरोपी अटक. | C24Taas |
सोनई पोलीसांनी घोडेगाव येथील आरोपी निलेश उर्फ निलकंठ मधुकर केदार रा.घोडेगांव ता.नेवासा याचे ताब्यातुन १ गावठी कटटा हस्तगत करुन गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयात आरोपी निलेश मधुकर केदार यास अटक करुन त्याचेकडे गुन्हयासंदर्भात कौशल्यपुर्वक तपास करुन त्याने त्याचा मित्र विजय बाळु सोनवणे रा आदर्शनगर, उरुळी देवाची, ता हवेली जि पुणे यास १ गावठी कटटा व २ जिवंत काडतुस विकल्याची कबुली दिली. त्यावरुन सदर गुन्हयाचे तपास सपोनि जनार्दन सोनवणे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ दत्ता गावडे, पोकॉ बाबा वाघमोडे यांचे पथक तयार करुन पुणे येथे रवाना केले. सदर पथकाने पुणे येथे जाऊन हडपसर पोलीस स्टेशन ची मदत घेवुन गुन्हयात पाहीजे आरोपी विजय बाळु सोनवणे याचा शोध घेत त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन १ गावठी कटटा व २ जिवंत काडतुसे पंचासमक्ष हस्तगत केले आहे. आरोपी विजय बाळु सोनवणे यास सोनई पोलीस स्टेशनला आणुन अटक करुन त्यास मा न्यायालयात हजर केले असुन सदर आरोपीस ३ जुलै पर्यत पोलीस कस्टडी मिळाली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि जनार्दन सोनवणे हे करीत आहेत. आरोपी विजय बाळु सोनवणे याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. १. श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १३०/२०१७ भा.द.वि.क. ३०२, ३९४(अ), ३४ प्रमाणे २. हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १३५८/२०१८ भा.द.वि.क. ३०७,३९७,३४ प्रमाणे सदरची प्रशंसनीय कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री अखिलेश कुमार सिंह साो अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे मॅडम श्रीरामपुर, मा पोलीस उपअधिक्षक मंदार जवळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि/ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ चव्हाण, पोहेकॉ दत्ता गावडे, पोना शिवाजी माने, पोकॉ विठठल थोरात, पोकॉ बाबा वाघमोडे व पोकॉ सचिन ठोंबरे यांनी केली आहे.